५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात मावो वादी मिलिंद तेलतुंबडेचा खेळ खल्लास
गडचिरोलीत २६ माओ वाद्यांचे एन्काऊंटर
गडचिरोली/ सरकार आणि सुरक्षा दलांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या २६ माओ वाद्यांना गडचिरोलीच्या जंगलात कंठ स्नान घालण्यात अखेर सुरक्षा दलांना यश आले असून शनिवारी झालेल्या चकमकीत २६ माओ वादी ठार झाले ज्यात माओ वाद्यांचा कमांडर आणि ज्याच्यावर ५० लाखांचे इनाम होते अशा मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. तसेच मृतांमध्ये ६ महिला माओ वाद्यांचा सुधा समावेश आहे
नक्षलवाद विरोधी पथकाच्या सी/ ६० पथकाला खास खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की धानोरा तालुक्यातील कोटगुल ग्यारपतीच्या जंगलात काही माओ वादी तळ ठोकून आहेत ही माहिती समजताच १०० कमंडोंच्या पथकाने शनिवारी पहाटे या भागाला वेढा दिला .आणि सकाळी ६ वाजल्यापासून जी चकमक सुरू झाली ती चार वाजल्यापासून सुरू होती या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे यच्यासह अडमा पोड्याम,प्रमोद उर्फ गणपत काचलयी,महेश उर्फ शिवाजी गोटा,चेतन पांदा, किशन उर्फ जैमन,महेश उर्फ शिवाजी गोटा,प्रदीप उर्फ तिलक जाडे,आणि उर्फ किवाची,प्रकाश उर्फ साधू सोनु, लच्छु,नथुराम उर्फ दिलीप मुलाची,लोकेश उर्फ मंगु पोड्यम्म,आदी २६ माओ वादी मारले गेले यात सहा महिला माओ वाद्यांचा समावेश आहे यापैकी काहींची ओळख पतायची आहे दरम्यान या चकमकीत राजेंद्र नेताम,सर्वेश्वर अत्राम,महरू कुळमेथे,आणि तुकाराम कटाँगे असे चार जवानही जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले या चकमकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी ६० कमंडोचे अभिनंदन केले आहे