ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषदेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या-बावनकुळे व खंडेलवाल विजयी -महाविकास आघाडीला दणका


मुंबई/ विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य सस्थांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या दोन जागांवर चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल या भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी मोठा विजय मिळवला असून सत्ताधारी महाविकास आघाडी साठी हा मोठा दणका आहे.
विधान परिषदेच्या दहा पैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडलाय गेल्यात तर अत्यंत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली वाशिम अकोला बुलढाणा मतदार संघात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी ४४३ मते मिळवली तर शिवसेनेचे बाजोरिया यांना ३३४मते मिळाली तर नागपूरमध्ये भाजपचे हेविवेट उमदवर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२मते मिळाली तर काँग्रेसचे देशमुख यांना १८६ मते मिळाली .या निवडणुकीत नागपूर मध्ये मोठे राजकारण बघायला मिळाले कारण भाजप मधून फुटून आलेल्या भोयर यांनी काँग्रेसने अगोदर विधान परिषदेची उमेदवारी दिली होती पण त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस मध्ये गटबाजी सुरू झाली प्रकरण पक्ष श्रेष्ठी पर्यंत गेले त्यामुळे काँग्रेसला ऐनवेळी उमेदवार बदलावा लागला आणि भोयर यांच्या जागी देशमुख काँग्रेसचे उमेदवार बनले पण त्यानं ५०४ पैकी फक्त १८६ मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३६२ मते मिळवून विजयी झाले.अशा तऱ्हेने महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे

हा तर घोडेबाजार करणाऱ्यांचा विजय / नाना पटोले
विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा मतदार संघात भाजपने घोडेबाजार केला मात्र आमचे उमेदवार आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्याने त्यांचा पराभव झाला तरीही नैतिक दृष्ट्या हा आमचाच विजय आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सांगितले

error: Content is protected !!