ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेचे दवाखाने भूमाफियांच्या रडारवर -पवईतील प्रयत्न हाणून पाडला


मुंबई -सध्या मुंबईत भूमाफियांचा सुळसुळाट झाला असून मोकळे आणि आरक्षित भूखंड हडपण्याची जणू स्पर्धा लागली आहे. आणि आता तर पालिकेचे दवाखाने हडपण्याचे प्रयत्न सुरु झाले असून पवईच्या तुंग गाव येथील एक दवाखाना हडपण्याचा भूमाफियांनी प्रयत्न केला पण पालिका अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला .

दवाखान्याची जागा भूमाफिया जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच एक प्रयत्न पवई येथील तुंगा व्हिलेजमध्ये झाला. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने याला विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला.

पवईच्या तुंगा गावामध्ये अगदी रस्त्याला लागून असलेल्या भूखंडावर पालिकेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक उभारले आहे.मात्र या क्लिनिकच्या जागेवर काही व्यक्तींकडून दावा ठोकण्यात आला होता आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं. त्यासाठी त्यांनी त्यांचे बाऊन्सर्स देखील या क्लिनिकमध्ये घुसवले.

नऊ तारखेला या क्लिनिकचं उद्घाटन होणार होतं, परंतु या गेटला खाजगी बाउन्सर्सकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर या क्लिनिकचे उद्घाटन होऊ शकलं नाही. याबाबत पालिका एल विभागाकडून तक्रार दाखल करून पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी पालिकेला आवश्यक मदत न केल्याने हा ताबा पालिकेला घेताच आला नाही. काल या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन करीत टाळे तोडण्याचा इशारा देण्यात आला होता. तर आज स्वतः उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त महादेव शिंदे हे शेकडो पालिकेचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक घेऊन या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हे टाळे तोडून आत प्रवेश केला.

पालिका एल विभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचा हा प्लॉट काही करून गिळू देणार नाही असा पवित्रा घेतला. पोलिसांची मदत मिळत नसली तरी आपण ताबा घेऊ असा निश्चय करून आज सकाळी अकरा वाजता त्यांनी इथे टाळे तोडून प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या बाऊन्सर्सना अक्षरशः हाकलून बाहेर काढले. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली.मात्र पालिकेचा पवित्रा पाहून बाऊन्सर मुकाट निघून गेले.

error: Content is protected !!