सरकार मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढणार
मुंबई/गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे दरम्यान सरकारवर पलटवार करताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे घटाने हिम्मत असेल तर महापालिका निवडणुका घेऊन दाखवा असे उघड आव्हान सरकारला दिले आहे
मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेच्या या सत्ता काळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता रस्ते, नालेसफाई आरोग्य खाते घनकचरा विभाग आदी विविध खात्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यागने सुद्धा या भ्रष्टाचाराची दखल घेऊन मुंबई महापालिकेत या भ्रष्टाचाराची चौकशीच्या आदेश दिले होते या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये फूट पडून शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजप बरोबर सरकार स्थापन केले तर सध्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासक आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षात महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी केली जात होती याच मागणीच्या अनुषंगाने आज सरकारने मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर पुढील अधिवेशनात श्वेतपत्रिका काढली जाईल असे नगर विकास मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे सरकारच्या या निर्णयामुळे महापालिकेत गेल्या 25 वर्षात झालेल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांची माहिती जनतेसमोर उघडकीस येणार आहे