ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

टाकवे गावात नाथा प्रतिष्ठानतर्फे चित्रकला स्पर्धा

टाकवे -सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील टाकवे गावच्या टाकवे हायस्कूलचे संस्थापक दिवंगत कर्मयोगी नाथा शेठ जाधव यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त १८ जानेवारी २०२३ रोजी शालेय सांस्कृतिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त पंचक्रोशीतील टाकवे, बाबवडे , पाचुंबरी, वाटेगाव , धामवाडी, पनुबरे, गिरजवडे, भैरववाडी , शिवरवाडी , घांगरेवाडी, पुदेवाडी, या सर्व शाळांमधील पहिली ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे बुधवार १८- १ -२०२३ रोजी सकाळी ११ ते २ या काळात हि स्पर्धा असेल २ ते ३ जेवणाची सुट्टी ३ वाजता उपस्थितांचा सत्कार ३. ३० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येईल .
कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानच्या संस्थापक सचिव प्रेरणा नाईकरे आणि अध्यक्ष सौ निवेदिता देशपांडे, सहाय्यक सल्लागार-.कुणाल साळवे.खजिनदार अमृत देसाई.
सहखजिनदार – सौ. वृषाली परब संस्थेच्या पदाधिकारी यांनी केले असून कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक खाडे यांच्या हस्ते होणार आहे .कार्यक्रमाचे संयोजन सूर्यकांत जाधव . विजय रावते आणि टाकवे गावचे ग्रामस्थ यानी केले आहे .

error: Content is protected !!