नेपाळमधील भीषण विमान अपघातात ७० ठार
खाटमांडु – नेपाळमधील पोखरा जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील ७० जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे . तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे अपघातग्रस्त विमान हे यती एअरलाईन्सचे होते.
नेपाळमधील पोखराजवळ यति एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान कोसळले आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे यति एअरलाइन्सचे एटीआर – ७२ विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. विमानात एकूण ८६ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, अशी माहिती यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि नदीत कोसळले. यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ कोसळलेले प्रवासी विमान यती एअरलाईन्सचे असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. दरम्यान अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
पोखराजवळ विमान कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले. या विमान अपघातातील आतापर्यंत ६२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विमानात भारतीय प्रवासीही होते. अपघातानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान दहल काठमांडू विमानतळावर रवाना झाले आहेत. पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.