ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

चेक बाऊन्स प्रकरणी खासदार गविताना पावणेदोन कोटींचा दंड व एक वर्षाची शिक्षा

ठाणे/ राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पाठोपाठ आणखी एका राजकीय पुढाऱ्यांना न्यायालयाने दणका दिला आहे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा कारावास आणि पावणेदोन कोटी दंडाची शिक्षा देण्यात आली आहे
खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर मधील साई नगर येथील आपली जागा विकसित करण्यापोटी पालघर येथील विकासक चिराग कीर्ती बाफना याच्याकडू १ कोटीची आगाऊ रक्कम घेतली होती . मात्र एकच जमीन दोन लोकांना देण्यात आल्याचे बाफना यांच्या लक्षात आल्यावर बाफना यांनी २०१७ मध्ये या प्रकरणी पालघरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता मात्र २०१९ साली २ कोटी ५० लाखांवर तडजोड झाली होती त्यानंतर १ कोटींचा एक चेक क्लेअर झाल्यावर २५ लाखांचे जे ६ चेक देण्यात आले होते ते मात्र बाउंस झाल्यामुळे बाफना यांनी पालघरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला .त्यानंतर पालघर न्यायालयात अनेक वेळा या प्रकरणी सुनावणी झाली न्यायमूर्ती विक्रांत खंदारे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेतल्यानंतर आज खासदार राजेंद्र गावित यांना १ वर्षाचा कारावास आणि १ कोटी ७५ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे दरम्यान या शिक्षेच्या विरुद्ध गावित यांनी अपील केले असून त्यावर १४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारमधील राज्य मंत्री बच्चू कडू यांना निवडणूक आयोगापासून संपती लपवल्या प्रकरणी २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती आणि आता चेकबाउंस प्रकरणात राजेंद्र गावित यांना शिक्षा झालीय

error: Content is protected !!