ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावरील युक्तिवाद सुरु


दिल्ली – शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला बुधवारी शिंदे गटाचे वकील साळवे युक्तिवाद करतील त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र -अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय ऑइल.

विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भातल्या मुद्द्यावर सात न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाने मागणी केली आहे. त्यावर आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया प्रकरणावर पुन्हा एकदा मोठ्या घटनापीठाकडून पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तर यावर तशी काही गरज नसल्याचं शिंदे गटाचे वकील अॅड. हरिष साळवे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. या प्रकरणावर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार असून त्यावर उद्या किंवा परवा यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पीठासीन व्यक्तीविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की नाही हा या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा. २०१६ ला अरुणाचल प्रदेशातल्या नबाम रेबिया केसमध्ये५ न्यायमूर्तीच्या पीठानं महत्वाचा निकाल दिला होता. अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासन अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही असं हा निकाल सांगतो. याच निकालाचा आधार घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय.

error: Content is protected !!