ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सुडाचे राजकारण पत्रकारितेपर्यंत- बीबीसीच्या दिल्ली मुंबई कार्यालयावर छापे

मुंबई – सत्ताधारी भाजपकडून सुडाचे राजकारण कशा प्रकारे सुरु आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गुजरात दंगलीवर आधारलेला एक माहितीपट बीबीसीने भारतात प्रदर्शित केल्याचा राग मनात ठेऊन आज सरकारच्या आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर छापे टाकले

आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर म्हणजेच बीबीसीच्या कार्यालय असलेल्या विंडसर इमारतीत दाखल झाले. बीबीसी कंपनीतील कर संबंधातील दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी आयकर विभागाच्या टीमने बीबीसीच्या कार्यालयात पोहोचली होती.
अधिकाऱ्यांनी आवारातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली तसेच कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन तपासले, असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई शिवाय नवी दिल्ली येथील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले होते.

आम्ही अधिकाऱ्यांशी सहकार्य केले आहे आम्हाला आशा आहे की ही समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल, असे बीबीसीच्या प्रवक्त्याने प्रतिक्रियेत म्हंटले आहे. आयकर विभागाने केलेली कारवाई “सर्वेक्षण” म्हणून असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते मुख्यमंत्री असताना गुजरा तेत २००२ साली झालेल्या दंगली संदर्भात वादग्रस्त माहितीपट बीबीसीने नुकताच काही दिवसांपूर्वी प्रसारित केला होता. भारत सरकारने दोन भागांच्या या माहितीपटाला बदनामी करण्यासाठी केलेला प्रचार भाग म्हणून सांगत भारतात बंदी घातली होती. नंतर काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत

error: Content is protected !!