ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण

ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आहेर आणि अन्य व्यक्तीमध्ये संभाषण झाले. त्या संभाषणामध्ये आहेर यांनी आव्हाडांना मारहाण करण्याची भाषा केल्याचे समोर आले आहे. तसेच आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला उडवायच असे कथित ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण असल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच यावर आव्हाड बोलताना म्हणाले, ”तो स्वत:च्या तोंडाने कबूल करत आहे. मी ही बातमी टीव्हीवर पाहिली. माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असल्याचे कथित ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्ती बोलतोय”, असं आव्हाड म्हणाले.
”माझी मुलगी, जावयापर्यंत आणि माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस या जगात पैदा व्हायचाय, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आहेर यांना आव्हाडांच्या समर्थकांकडून मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.

error: Content is protected !!