आरोप होऊनही अजित पवारांकडून पाठराखण – धनंजय मुंडेना पक्षात मानाचे स्थान
मुंबई : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
- कोअर ग्रुपच्या अग्रस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार राहणार आहेत. तर त्यांच्यासोबत आणखी सहा मंत्र्यांना या कोअर ग्रुपचे सदस्य करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, आ. दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कोअर ग्रुपमध्ये समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षसंघटनेची बांधणी, महत्वाच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणे याची जबाबदारी सदस्यांवर असणार आहे
