जे. जे. उड्डाणपुला खालील संपूर्ण रस्ता दुभाजकाचे आकर्षक सुशोभिकरण कामास सुरुवात
मुंबई महापालिकेच्यावतीने ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पालिकेच्या ए, बी आणि सी विभागातून जाणाऱ्या जे.जे. उड्डाणपुलाखालील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी साठी गगराणी यांनी भेट दिली . त्यावेळी सहायक आयुक्त (बी विभाग) शंकर भोसले यांच्यासह कार्यकारी अभियंता सूर्यकांत चौधरी, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे- निखिल कीर्तने, अभियंता – सागर शिवुडकर, किरण भांगरे, अक्षय गायकवाड आदी संबंधित अभियंते उपस्थित होते.
मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. रूग्णालय जंक्शन ते महात्मा जोतिबा फुले मंडई हा वर्दळीचा मार्ग आहे. नागरिक, प्रवाशांच्या सोयीसाठी पालिकेने रस्ता दुभाजक बांधला आहे. संपूर्ण रस्ता दुभाजकाचे आकर्षक तसेच संकल्पना आधारित (थीम बेस्ड्) सुशोभिकरण करण्यात यावे. अंदाजे ३ मीटर रूंदीच्या दुभाजकाचे आकर्षक पद्धतीने बागकामे (लॅण्डस्केपिंग) करावीत. ध्वनीप्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत. एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत. पर्यावरणपूरक सुशोभिकरण करावे. दुभाजकांचा दुरूपयोग होऊ नये, कठड्यांची मोडतोड, नासधूस होऊ नये यासाठी आवश्यक असल्यास सुरक्षाव्यवस्था करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले .
