पोलीस अमलदार श्रीमती अलका ठाकूर यांचा गौरव
महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसाळकर यांनी विशेष शाखेत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस महिला अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
चार पोलीस महिला अधिकारी व पाच महिला पोलीस अमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे सदरचा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त कार्यालय भरू चा हॉल येथे दिनांक १४/३/२०२३ रोजी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेले आहे.

महिला पोलीस अमलदार श्रीमती अलका ठाकूर यांनी सचोटी प्रामाणिकपणा व वेळोवेळी गोपनीय माहिती प्राप्त करून पोलीस खात्याला शोभेल अशी कामगिरी केलेली आहे