धारावीतील अतिक्रमणावर पालिकेचां हातोडा
मुंबई/आशिया खंडातील सर्वात मोठीझोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा महाप्रकल्प सरकारने हाती घेतला आहे .त्यासाठीअडाणी ग्रुप कडे या प्रकल्पाचे पुनर्विकासाचे देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियमानुसार प्रकल्प बाधितांना याच ठिकाणी पक्की घरे देण्याची जी योजना आखली गेली आहे तिचा फायदा घेण्यासाठी काही लोक धारावीत अतिक्रमण करीत आहेत .अनधिकृत चोपड्या बांधत आहेत. जेणेकरून या झोपड्यांच्या बदल्यात त्याला पक्के घर मिळावे .असा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे .इथल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने नुकतीच कारवाई केलेली आहे. पालिकेचे उपयुक्त सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत, पाच अभियंते, 50 कामगार, आणि अतिक्रमण विरोधी इतर साहित्य आधी सह ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता धारावी विकास प्रकल्पात बोगस लाभार्थी घुसण्याचा मार्ग बंद झालेले आहेत .पालिकेच्या
या कारवाई बद्दल धारावी करानी समाधान व्यक्त केलेले आहे .धारावीचा पुनर्विकास ही एक मोठी अवघड जबाबदारी होती .कारण त्या ठिकाणी हजारो झोपड्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण झोपड्यांचा सर्वे करणे, आणि पलिकेच्य नियमानुसार १९९५ पर्यंतच्या अधिकृत झोपड्यांना पात्र ठरवणे , खूप कठीण काम होते
परंतु पालिकेने हे काम पार पाडल्याचे दिसत आहे .त्यामुळे पुढील काही वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन धारावी मधील पात्र झोपडी धारकांना त्यांच्या हक्काचं मजबूत घर मिळू शकेल .आणि झोपडपट्टीत राहून ज्यांनी अनेक वर्षे जी काही दुःख आणि समस्यांचा मुकाबला केला. त्यातून त्यांची सुटका होणार आहे
