ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

आंतरविभागीय खात्यांतर्गत ५१ व्‍या नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कामाची जबाबदारी सांभाळून नाटकामध्ये अभिनय करणे ही कौतुकास्पद बाब – नाटयसिने कलावंत

श्री. सुबोध भावे

चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यामध्ये नाट्यस्पर्धेची मुख्य भूमिका – सह आयुक्त श्री. मिलिन सावंत

मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर असून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन मोठया हिमतीने महानगर व्यवस्थापन करत आहे. मुंबईकरांना न थकता अविरतपणे नागरी सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेचा प्रत्येक अधिकारी – कर्मचारी आनंदाने करत आहे. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या दुनियेत आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून उर्वरित वेळेत नाटकामध्ये सहभागी होऊन अधिकारी – कर्मचारी नाट्य कला जोपासतात. सतत ५१ वर्षे या स्पर्धेच्या माध्यमातून आपले काम सांभाळून कलेची सेवा करतात आणि कलागुणांची जोपासना करतात, ही बाब खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नामवंत नाटयसिने कलावंत श्री. सुबोध भावे यांनी केले.
..
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्‍या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा सन २०२२ – २३ चा पारितोषिक वितरण समारंभ नामवंत सिने नाटय कलावंत श्री. सुबोध भावे यांच्या हस्ते गुरुवार, दि. १३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी भायखळा येथील लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे नाटयगृह येथे पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
..
याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापालिका सह आयुक्त (सामान्‍य प्रशासन विभाग) श्री. मिलिन सावंत उपस्थित होते. तर सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. सुनील धामणे, सहआयुक्‍त (आयुक्‍त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. उप आयुक्‍त (विशेष) श्री. संजोग कबरे, उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) श्री.संजय कु-हाडे, उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) श्री. सुनील राठोड, संचालक (वैदयकीय शिक्षण व प्रमुख रूग्‍णालये) डॉ. नीलम अंद्रादे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्‍ठाता डॉ. संगीता रावत, बा.य. ल. नायर रुग्णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. प्रवीण राठी, नगर अभियंता श्री. गिरीश निकम, व्‍यवसाय विकास विभागाच्या प्रमुख श्रीमती शशी बाला, नृत्यांगना अंकिता वालावलकर आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती.
.. याप्रसंगी बोलताना श्री. सुबोध भावे म्‍हणाले की, अवाढव्य पसरलेली आपली मुंबई महानगरी ही खऱ्या अर्थाने स्वप्न नगरी आहे. विविध स्वप्ने उराशी बाळगून भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या मुंबई महानगरीत येत असतात. अव्याहतपणे काम करणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा मुंबईच्या पावणे दोन कोटी लोकसंख्येसाठी नागरी व्यवस्थापन करते, हे अभिमानास्पद आहे. या रहाटगाड्यातही अधिकारी – कर्मचारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, महापालिकेच्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून नाट्यस्पर्धेत नुसते सहभागी न होता बक्षिसे मिळवितात , विविध कलाप्रकारांची जोपासना करतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक उत्तम कलाकार मंडळी आहेत. ही खरोखरच विलक्षण बाब आहे. प्रत्येक कलावंत हा माणसाचा जीवनानुभव आपापल्या पद्धतीने प्रकट करीत असतो. धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकाने आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून कलेसाठी आणि कुटुंबासाठीही वेळ द्यावा, असा मौलिक सल्लासुद्धा त्यांनी आपल्या संवादादरम्यान दिला.
..
या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना महानगरपालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलीन सावंत म्हणाले की, या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले, याचा मनस्वी आनंद होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवा सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील कलागुणांच्या विकासासाठीही कार्यरत असते. आपला कर्मचारी वर्ग विविध भावस्पर्शी विषयांवर नाटके बसवितो. नाट्य कलेच्या विविध प्रकारात आपले कर्मचारी पारंगत आणि निपुण आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.‌ आपण कोणत्याही प्रकारचे जरी काम करीत असलो, तरी आपल्या कार्यात माणुसकीचा स्पर्श असला, तरच आपले कार्य अतिशय उत्कृष्ट होऊन आपल्यामध्ये सकारात्मक बदल होत असतो. नाट्य स्पर्धेतून मिळालेला आनंद, ऊर्जा घेऊन नागरिकांना उत्तमोत्तम सेवा देऊ असेही श्री. सावंत यावेळी म्हणाले.
.. महानगरपालिकेच्या या नाट्यस्पर्धेला ५१ वर्षांची परंपरा असून अनेक मोठे कलाकार या नाट्यस्पर्धेतून नावारुपाला आले आहेत. महानगरपालिकेची नाट्यस्पर्धा ही अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याची पहिली पायरी असून या संधीचे आपण सोने करावे, अशी सूचनाही सहआयुक्त श्री. सावंत यांनी यावेळी केली. कामगार खात्याने आपली जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल श्री. सावंत यांनी कामगार खात्याचे अभिनंदन केले.
.. प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कामगार विभागाच्या वतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बृहन्मुंबई महापालिका नागरिकांना सेवा – सुविधा देण्यासोबतच महानगर पालिका कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक स्थिती सुदृढ राहण्यासाठी नाटयस्पर्धा आयोजित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संवेदनशील माणूस बनण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करणे महत्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्मचा-यांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होऊन तो सुजाण नागरिक कसा होईल, याविषयी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कामगारांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
.. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या कामगार खात्याच्‍या वतीने ५१ वी आंतरविभागीय खात्‍यांतर्गत नाटस्‍पर्धा ही २१ फेब्रुवारी २०२३ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले येथे आयोजित करण्‍यात आली होती. या नाटयस्‍पर्धेसाठी परिक्षक म्‍हणून श्रीमती दीपश्री चाफेकर, .अनंत सुतार, मंगेश नेहरे यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय कामगार कल्याण अधिकारी प्रवीण नगराळे आणि त्यांच्या चमुने विशेष परिश्रम घेतले.
.. यंदाच्या नाट्य स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर मध्य ‘विभागाने सादर केलेल्या ‘निर्वासित’ या नाटकाला मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर अनुप येरुणकर यांना ‘जेंडर अँड आयडेंटिटी’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट, अभिनेता म्हणून आणि प्रियांका जाधव यांना ‘निर्वासित’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.
..यंदाच्या नाट्यस्‍पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
👇
उत्‍कृष्‍ट नाटयप्रयोग

१) निर्वासित (सहायक आयुक्त आर मध्य विभाग) (प्रथम क्रमांक)

२) माझा खेळ मांडू दे (कर निर्धारक व संकलक मुख्यालय), (द्वितीय क्रमांक)

३) जेंडर अँड आयडेंटिटी (अधिष्ठाता, रा. ए. स्मा. रुग्णालय), (तृतीय)

४) लोकोमोशन (सहायक आयुक्त, ए विभाग (उत्‍तेजनार्थ)

५) आत्मकथा (जलअभियंता ), (उत्‍तेजनार्थ)

उत्‍कृष्‍ट अभिनेता
👇
१) अनुप येरुणकर, जेंडर अँड आयडेंटिटी (प्रथम),

२) अजिंक्य नंदा, निर्वासित (द्वितीय),

३) किरण पाटील, घंटानाद (तृतीय)

उत्‍कृष्‍ट अभिनेत्री
👇
१) प्रियांका जाधव, निर्वासित (प्रथम),

२) अपर्णा शेट्ये , माझा खेळ मांडू दे (द्वितीय),

३) वंदना गानू , घंटा (तृतीय)
..
उत्‍कृष्‍ट रंगभूषा
१) भरत बेंडगुळे (प्रथम)

उत्‍कृष्‍ट वेशभूषा
रुबी जेम्स, शुधाग्नी (प्रथम),
तृप्ती गिरकर, जेंडर अँड आयडेंटिटी (द्वितीय)
..
लक्षवेधी भूमिका
१) महेश अनुदत्त , इच्छा माझी पुरी करा (प्रथम क्रमांक)
..
उत्‍कृष्‍ट नाटय लेखन
👇
१) निर्वासित (प्रथम),

२) माझा खेळ मांडू दे (द्वितीय),

३) जेंडर अँड आयडेंटिटी (तृतीय)

उत्‍कृष्‍ट नेपथ्‍य
👇
१) संदेश जाधव, शुधाग्नी (प्रथम),

२) जयेश पवार , थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक (द्वितीय)

उत्‍कृष्‍ट संगीत
👇
१) महेंद्र मांजरेकर, ती रात्र (प्रथम),

२) कृणाल तांबे, सुरु (द्वितीय)
..
उत्‍कृष्‍ट प्रकाश योजना
👇
१) प्रकाश गोठवणकर, निर्वासित (प्रथम),

२) राजविलास इंगळे, आत्मकथा (द्वितीय)
..
उत्‍तेजनार्थ पारितोषिक (पुरूष)
👇
१) वैभव कदम, निर्वासित

२) अमित वैती, जेंडर अँड आयडेंटिटी

३) विनय चिंदवडकर, पी

४) नारायण पोत्रेकर, इच्छा माझी पुरी करा

५) कुणाल तांबे, सुरु

६) गणेश भालेराव, प्रश्न कायद्याचा आहे

७) प्रवीण भार्गव

८) रोहित पवार, ती रात्र

९) नरेश कांबळे, शुधाग्नी

१०) महेंद्र पवार , लोकोमोशन

११) संदेश जाधव, निर्वासित

१२) प्रथमेश भोसले, चेकमेट
..
उत्‍तेजनार्थ पारितोषिक (स्‍त्री)
👇
१) श्रुतिका शिंदे, निर्वासित

२) श्रद्धा पोतनीस, माझा खेळ मांडू दे

३) मृदुला अय्यर, लोकोमोशन

४) स्नेहा ठोंबरे, इच्छा माझी पुरी करा

५) पूजा पाचरकर, सुरु

६) अर्चना कदम, थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक

७) प्रणया गायकवाड, वाहते हि दुर्वांची जोडी

८) कल्पना भिसे, ती रात्र

९) भावना रहाटे, शुधाग्नि

१०) अनुष्का शिनारे, संगीता

११) विभावरी राणे, प्रश्न कायद्याचा आहे

१२) भारती रेगे – सावंत, चेकमेट

१३) संपदा सोनटक्के, आत्मकथा

१४) जुईली मेश्राम, निलवं

१५) मंगला जाधव, धुम्मस

error: Content is protected !!