ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खिंडार – धैर्यसिंग मोहिते पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत

माडा – भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली. आपण शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय का घेतला? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली. त्यांच्याकडून प्रचंड घोषणाबाजी करुन मोहिते पाटील यांचं समर्थन करण्यात आलं. यावेळी मोहिते पाटील यांनी इतिहासातील घडामोडींविषयी भाष्य केलं. तसेच भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काय-काय घडामोडी घडल्या, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
“मी दिवाळी पाडव्याला इच्छा व्यक्त केली की, खासदारकीसाठी मी इच्छुक आहे म्हणून. मी सगळ्या मतदारसंघात फिरत राहिलो. भाजपची 13 मार्चला उमेदवारी जाहीर झाली. मी म्हटलं आता घरी बसू. पुढच्यावेळेस संधी मिळेल तेव्हा बघू. पण माळशिरस तालुक्याची जनता तसेच माढा लोकसभेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने मोठ्या दादांना आणि बाळादादांना भेटायला सुरु केलं. भैय्याला आमच्या गावात पाठवून द्या. भेटायचं आहे. मग बाळादादांनी सांगितलं की, प्रत्येक गावात जा आणि लोकं काय म्हणतात ते ऐकून घ्या. मी प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबापांसून रणजित दादा यांनी आपापली पदे असताना काय-काय दिलं याची उजळणी गावकरी करुन देत होते. पण सर्वांनी आठवण करुन दिली. एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं, उभं राहणार असाल तर या, नाहीतर गाडीत बसा आणि जा. जाईल तिथे असाच पट्टा सुरु झाला”, असा अनुभव धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितला.
“मी हे सर्व कुटुंबियांना सांगत होतो. त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी दुधाचे दर, शेतकऱ्यांची अवस्था, पाण्याचे प्रश्न सांगायला सुरुवात केली. एढ्या व्यथा ऐकल्यानंतर मी एका दिवशी ठरवलं की आता माझ्यासाठी मला उभं राहायचं नाही. कारभारी चांगला असावा लागतो. या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना चांगला कारभारी पाहिजे. चांगला कारभार करण्याची शिकवण आम्हाला सहकार महर्षी आणि मोठ्या दादांनी दिला आहे. आता तुम्हीच सांगा आम्ही काय निर्णय घ्यायचा?”, असा सवाल मोहिते पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना केला.

error: Content is protected !!