ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

मुंबई, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांना सर्वद फौंडेशन तर्फे राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वद फौंडेशनच्या सुचिता पाटील आणि ओंकार देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार, ४ मे २०२४ रोजी एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार योगेश वसंत त्रिवेदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते वसंतराव त्रिवेदी यांनी ११ जून १९६६ रोजी अंबरनाथ येथून परमपूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी दिनी साप्ताहिक आहुति सुरु केले. या आहुति मधून योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपली पत्रकारिता १९७३ पासून सुरु केली. नवशक्ती, मुंबई सकाळ मधून पत्रकारिता करीत असतांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १५ डिसेंबर १९८८ रोजी मातोश्री येथे मुलाखत घेऊन दैनिक सामना साठी योगेश वसंत त्रिवेदी यांची उपसंपादक वार्ताहर म्हणून नियुक्ती केली. २५ वर्षे सेवा बजावून १९ ऑक्टोबर २०१३ रोजी नियत वयोमानानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी ते निवृत्त झाले. त्यानंतर दहा वर्षे गुजरात समाचार मध्ये विशेष राजकीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सेवा बजावली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर तीन वर्षे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे प्रतिनिधित्व केले . या कालावधीत अनेक महत्वाचे ठराव त्यांनी मांडले आणि सर्वानुमते ते मंजूर करण्यात आले ‌ अनेक वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन सुरू ठेवले आहे. ‘मार्मिक’ चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी त्यांचा चौफेर या नावे स्तंभ सुरु केला आहे. या द्वारे त्यांनी राजकीय विश्लेषक म्हणून परखड लेखन सुरू ठेवले आहे. अनेक वृत्तवाहिन्या मधून त्यांनी परखडपणे विश्लेषक म्हणून मते मांडली आहेत. कोरोनाच्या काळात पासषटायन आणि गुरुजी ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नांवाने जीवनगौरव पुरस्कार सहित अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येऊन त्यांच्या पत्रकारितेचा गौरव करण्यात आला आहे.

error: Content is protected !!