काँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट
जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस मधील एका कुटुंबातील फक्त एकालाच निवडणुकीचे तिकीट देण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला आहे .त्यामुळे भविष्यात काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होणार नाही .
काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यातील महत्वाचा मुद्दा होता .तिकिटांचा त्यावर आता पडदा पडला आहे गांधी कुटुंबीय सोडले तर काँग्रेस मधील इतर कुठल्याही कुटुंबात एक पेक्षा अधिक निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात जी काँग्रेसची घराणे आहेत ज्यात एक खासदार त्याचा मुलगा आमदार मुलगी नगरसेविका असा प्रकार यापुढे बघायला मिळणार नाही तसेच काँग्रेस ऑक्टोबर मध्ये भारत जोडो अभियान सुरू करणार आहे स्वतः राहुल गांधी संपूर्ण भारतात फिरून काँग्रेसचा जनाधार वाढवणार आहेत .