ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सोशल मीडियावर बंदी घालण्याची आवश्यकता


सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून केवळ या देशातीलच नव्हे तर जगातील माणसे जोडता येतात.आणि त्यातून व्यापार ,उद्योग,सांस्कृतिक,आर्थिक,सुरक्षा विषयक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करता येते.जगातील घडामोडी कळू शकतात त्यावर भाष्य करता येते.मित्रपरिवार जोडत येतो असे कितीतरी सोशल मीडियाच्या फायदे आहेत.पण दुर्दैवाने कुठल्याही गोष्टीला दुसरी बाजूही असते.आणि ती अर्थातच चांगली नसते .सोशल मिडयाला दुसरी बाजू आहे आणि ती खूप काळी आणि माणसाचे जीवन अंधकारमय करणारी आहे.आणि हीच काळी बाजू सध्या सोशल मीडिया साठी घटक ठरलेली आहे .कारण सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला जातोय.एकीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जात आहे त्यातून सामाजिक कार्य केले जात आहे तर दुसरीकडे फेसबुक,वॉट्स अप,instagram,यांच्या माध्यमातून सेक्स चां बाजार मांडला जात आहे.अश्लील कथा,अश्लील व्हिडिओ क्लिप ,महिलांचे अश्लील न्यूड फोटो फेसबुकवर टाकले जात आहेत.आणि वासनेच्या या खेळात शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुण अडकत आहेत आणि त्याचे आयुष्य बरबाद होत आहे.कारण अशा प्रकाराने एखाद्याला सहजपणे जाळ्यात ओढले जाते आणि त्याला सतत ब्लॅक मेल करून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते अशा बऱ्याच केसेस उघडकीस आल्या आहेत.ज्यामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर सोशल मीडियाचा वापर एखाद्याची बदनामी करण्यासाठी केला जातोय .जातीयवाद भडकवण्या साठी केला जातोय.त्यातून दंगली भडकतात त्यात निरपराध लोक मारले जातात आणि सामाजिक स्थैर्य,बिघडते आहे.त्यामुळे हे जर थांबवायचे असेल तर सोशल मीडियावर एकतर बंदी घालणे आवश्यक आहे किंवा त्यावर सेन्सॉरशिप लादणे गरजेचे आहे.केवळ दंगली भडकल्या नंतर इंटरनेट सेवा बंद करण्याचा काहीही अर्थ नाही.केतकी चितळे नाव ह्या बाईने शरद पवार यांच्या विषयी जी पोस्ट केली होती ती वाचून लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली.80 वर्षाच्या एका वयोवृध्द नेत्याबद्दल इतक्या घाणेरड्या शब्दात लिहणे आणि त्यातून सामाजिक तणाव निर्माण करणे चुकीचे आहे .

तणाव वाढवणाऱ्या या गोष्टींना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे .पण अशा गोष्टींबद्दल सुधा पोलिसांकडे तक्रार यावी लागते तरच पोलीस कारवाई करतात.वास्तविक पोलिसांचा जो सायबर सेल आहे त्याचे सोशल मीडियावर बारीक लक्ष असायला हवे होते त्यांनी स्वतःहून अशा गोष्टी रोखण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा .पण दुर्दैवाने तसे होत नाही त्यामुळे केतकी सारख्या बायाना सोशल मीडियावर काहीही पोस्ट टाकायची भीती वाटत नाही पण त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात त्याचे काय ?

error: Content is protected !!