ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरांगे पुन्हा उपोषण करणार


जालना/मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांसाठी चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र आपल्या समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला जरूर पाडावे असे मात्र मी समाजाला सांगितलेले आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या सोयऱ्यांबाबतच्या मागणीचा पुनरुचार केला आहे
जरागे पाटील यांनी सांगितले की कुणबी आणि मराठा एकच असून आमची सग्या सोयर्या बाबतची मागणी सरकारने तात्काळ मान्य करावे. अन्यथा संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल यावेळी त्यांनी मोदींवर टीका करताना मोदी आजकाल सतत महाराष्ट्रात यायला लागले आहेत. तर भाजपच्या पाच नेत्यांमुळे आमच्या आरक्षणात अडथळे आले असा आरोप हे त्यांनी केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आयुष्यात पहिल्यांदाच खरं बोलले त्याने सांगितले की जरागे यांनी या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आणि ते खरेच आहे मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही परंतु जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा मात्र ताकतीने लढवणार आहोत असेही सरांनी सांगितले

error: Content is protected !!