घाटकोपर दुर्घटनेचा आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार- मृतांचा आकडा 14 तर 74 जखमी
*
सोमवारी वादळी पावसात घाटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर होलर्डीग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 14 झाली आहे तर इगो इंडिया कंपनीचा मालक भावेश भींडे फरार झाला आहे या भावेशवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.पण तो फरार आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत त्याच बरोबर या प्रकरणात भावेशला काही पालिका अधिकाऱ्यांनी मदत केली होती अशी सुधा चर्चा आहे त्यामुळे घाटकोपर मधील पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. दरम्यान भावेशचे राजकीय यांच्या बरोबरचे फोटो प्रसिद्ध झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे
