ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

देहुमध्ये अजित दादांना भाषणाची संधी नाकारली -नवा राजकीय वाद सुरू


पंतप्रधानासमोर उप मुख्यमंत्र्यांचा अपमान
देहू/ भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत काल देहू मध्ये पंत प्रधान मोदी यांच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा याना भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे ‘
काल देहू मध्ये तुकाराम महाराजांच्या शिलेचे लोकार्पण पंत प्रधान मोदी यांच्या हस्ते झाले मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या आमदारांना परवानगी नसल्याने राष्ट्रवादीत अगोदरच नाराजी होती . त्यातच पुण्याचे पालक मंत्री अजितदादा पवार यांना या कार्यक्रमात बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली पण उपमुख्यमंत्र्यांना नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आणि आयोजकांवर कडाडून हल्ला केला तसेच अमोल मेटकरी आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही टीका केली आहे . दरम्यान या कार्यक्रमात मोदींनी पालखी मार्गासाठी 18 हजार कोटी देण्याचे मान्य केले आहे .मात्र अजित पवारांचा अपमान राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलंय मात्र मुंबईतील राज भवणावरच्या कार्यक्रमात आणि गुजरात समाचारच्या द्वीशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसण्यास आदित्य ठाकरे यांना बसण्यास सुरक्षा रक्षकांनी विरोध केल्याने मुख्यमंत्री चांगलेच संतापले अशा तऱ्हेने काल मानापमान नाट्य रंगले

error: Content is protected !!