हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.
सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज ठाकरे यंचा पक्षही उतरला होता त्यासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते पण त्यांना ब्रिज भृषण नावाच्या भाजपा खासदारांनी विरोध केला त्यावरून मोठे वादळ उठलं होते .अनेक उत्तर भारतीयांचा राजच्या दौऱ्याला विरोध होता अखेर हा दौरा रद्द करावा लागला मात्र आदित्य याने काल अयोध्येचा दौरा केला .त्यांच्या सोबत हजारो शिवसैनिक होते त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली संत महंतना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि पत्रकार परिषदेत अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याची घोषणा केली . त्यासाठी युपिचे मुख्यमंत्री योगी महाराज यांना मुख्यमंत्री पत्र पाठवणार आहेत .अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधल्यास महाराष्ट्रातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे .आदित्यच्या या घोषणेमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .