बिपरर्जोय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार
पोरबंदर -महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल१४५किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या ७४ हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय झालेलं असेल, हे सकाळीच स्पष्ट होईल. दरम्यान पुण्यातील चं पथक द्वारकेमध्ये मदतकार्य करत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून आठ किनारी जिल्ह्यांमधून यापूर्वीच ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. चक्रीवादळाचा मोठा तडाखा कच्छच्या किनाऱ्याला तसेच देवभूमी द्वारकेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्छ किनारपट्टीतील २४० गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. शिवाय दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूकदेखील बंद करण्य़ात आली आहे दरम्यान, गुजरातमध्येएनडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात असून लष्कर, नौदल आणि वायुदलाचीही मदत घेण्यात आली आहे.
गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर गुरुवारी संध्याकाळी धडकलं. त्यानंतर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा) सुरू झाला. त्यामुळे किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेगही १२५ ते १४५ किमी इतका आहे. त्यामुळे अनेक झाडे कोसळली आहेत.
दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.