ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

नव्या सरकारचे राज्यातील जनतेला पाहिले गिफ्ट पेट्रोल डिझेल स्वस्त


मुंबई/महाराष्ट्रातील नवे सरकार आता कामाला लागले आहे.जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय राबवायला सुरुवात केली आहे कारण काल राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे .पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे या दर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर 2021 आणि 22 मे 2022 अशी दोन वेळा पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी कपात केली होती त्यानंतर भाजपा शाशित राज्यांनीही त्यांच्या राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करायला सुरुवात केली मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करीत नव्हते .त्यामुळे भाजप कडून सतत सरकारवर टीका केली जात होती . अखेर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिवसेनेतील फुतिरांच्या मदतीने शिंदे गट आणि भाजपचे सरकर सतेवर आले या सरकारने आज कॅबिनेटच्या बैठकीत पेट्रोलच्या दरात 5 रुपयाची आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली.दरम्यान ही अल्प दरवाढ म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे असा आरोप विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी केला असून जर दर कपात करायचीच होती तर 50 टक्के कपात का नाही केली असा सवालही त्यांनी केला .

error: Content is protected !!