ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

चीनची सावकारी

सावकारी पाश हा किती भयंकर असतो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांवरून दिसून येईल.महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांमध्ये 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.कारण कर्जबाजारी माणसाची कर्ज फेडण्याची कुवत संपल्यावर आत्महत्या हा एकच पर्याय त्याच्यासमोर असतो .पण एक क्रर्जबाजारी व्यक्ती आणि एक कर्जबाजारी देश यांच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर भलेही दोघांची समस्या एकच असली तरी परिणाम वेगवेगळे असतात.श्रीलंका एक व्यक्ती असती तर आत्महत्या करून मोकळा झाला असता पण तो एक देश आहे आणि जेंव्हा एखादा देश दिवाळखोरीत जातो आणि त्या देशात सगळ्याच गोष्टींची टंचाई निर्माण होते तेंव्हा लोकांना रस्त्यावर उतरावे लागते आज श्रीलंकेची तीच अवस्था आहे.आणि श्रीलंकेच्या या अवस्थेला आशिया खंडात सावकारी करणारा चीन जबाबदार आहे . श्रीलंकेवर चीनचे ५ अब्ज अमेरिकन डॉलर इतके कर्ज आहे .शिवाय इतर देशांकडून सुधा श्रीलंकेने कर्ज घेतलेले आहे आणि कर्जाची ही सर्व रक्कम 51 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.आता येवढे कर्ज फेडायचे म्हटल्यास देशाचे महसुली उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे .आणि त्यासाठी विदेशी गुंतवणूक यायला हवी पण श्रीलकेतील परिस्थिती आज हलाखीची आहे . सध्या तांदूळ 300 ते 400 रुपये किलो आहे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले बरे बाहेरून काय मागवायचे म्हटल्यास परकीय चलन संपत आले आहे. मग आयातीसाठी पैसा कुठून येणार.जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचे हप्तेही थकलेत त्यामुळे जागतिक बँकेकडून कर्ज मिळणे कठीण आहे आणि याचाच फायदा चीनने घेतला आणि श्रीलंकेला भरमसाठ कर्जाच्या विळख्यात अडकवून टाकले आहे.

कारण चीनला भारतावर दबाव टाकण्यासाठी अरबी समुद्रात मोठा तळ हवा होता तो श्रीलंकेच्या रूपाने मिळाला.तर दुसरीकडे चीनने नेपळलही कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे.पाकिस्तान तर चीनच्या रोटीच्या तुकड्यावर जिवंत आहे .याचा अर्थ भारताच्या चहूबाजूला चीनने आपले आर्थिक गुलाम तयार केलेत .आणि याकडे भारताने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे कारण चीनचा हा सावकारी पाश भारताच्या शेजाऱ्यांच्या मानेभोवती चीनने असा काही अडकवला आहे की त्यातून श्रीलंका, नेपाळ,बंगला देश आणि पाकिस्तानची सुटका नाही आज केवळ श्रीलंका च नाही तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधा श्रीलंके सारखीच आहे . फरक एवढंच की श्रीलंकेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत तर पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरण्याचा तयारीत आहे .मात्र तिथे कधीही प्रमाणेच परिस्थिती निर्माण होऊ शकते.आता हे देश कर्जबाजारी का झाले तर त्याची अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली घेतलेली कर्ज आणि त्या कर्जाचा सतेतील लोकांनीच केलेला ऑफर यामुळे ज्या प्रकल्पांसाठी परदेशातून कर्ज काढली गेली त्याचे हप्ते थकले त्यामुळे थकलेले हप्ते चुकवण्यासाठी पुन्हा कर्ज चीनने कर्जाची ही साखळी अशीच चालू ठेवली होती आणि त्यात संपूर्ण श्रीलंका उध्वस्त झाली तीच परिस्थिती नेपाल आणि पाकिस्तानात आहे.आणि म्हणूनच श्रीलंकेच्या नागरिकांनी सरकारवर हल्ला केला राजभवनावर ताबा मिळवून राष्ट्रपतींना श्रीलंकेतील पळवून लावले तसेच पंतप्रधान विक्रमसिंगे यांच्या घराला आग लावली अखेर श्रीलंकेत आणीबाणी लावण्यात आली हे सर्व भयंकर आणि तितकेच संतापजनक आहे आणि म्हणूनच यातून भारताने धडा घ्यायला हवा .

error: Content is protected !!