ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विशाळगडावर शिवभक्तांच्या राडा – तोडफोड जाळपोळीनंतर जमावबंदी ,१२ पोलिसांसह १८ जखमी

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना सुद्धा झाल्या. विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. दर्ग्यावर सुद्धा हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे शिवभक्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आंदोलन मागे घेतलं. मात्र, जर सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर शिवभक्तांचा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. दरम्यान विशाळगडावर झालेल्या दगफेक , तोडफोडीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह उप अधीक्षक पोलीस निरीक्षक आदी मिळून १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले.
दरम्यान, विशाळगडावर परिस्थिती नियंत्रण असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र पंडित यांनी काही संशयितांची ओळख पटली असल्याचे सांगितले. दुसरीकडे आक्रमक भूमिक घेतलेल्या संभाजीराजे यांनीही गडावर हजेरी लावली. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी, चालेल पण शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका, सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजी राजे यांनी छत्रपती यांनी दिला. उद्यापासून अतिक्रमण काढून घेतलं जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याचे संभाजी राजे छत्रपती म्हणाले. ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या पण तो शिवभक्तांचा आक्रोश होता. जर सरकारने दोन दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवर गुन्हे दाखल करू नका असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावित अन्यथा हिंदुत्ववादी संघटना वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला होता. विशाळगडावरील वाद दोन धर्मातील नसून तो केवळ अतिक्रमणांचा आहे. दोन्ही धर्मियांची अतिक्रमणे आहेत. सर्वच अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करू नयेत, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.

error: Content is protected !!