ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढले- मंत्र्याची जाहीर कबुली

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून दररोज काही न काही बातमी चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेवरून विरोधी पक्षांनी सत्ताधरी पक्षावर टीका केली आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्यसरकारने मोठे कर्ज काढल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावरून शिंदे गटाचे मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर कबुली दिली. आता विरोधक बोलतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढले. हो! आम्ही कर्ज काढू. पण, आमचे सरकारच ते कर्ज फेडणार आहोत असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई येथे पाटण विधानसभा रहिवाशांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पाटण विधानसभा अंतर्गत लोकांची, नागरिकांची विचारपूस करण्यासाठी आलोय ते यावेळी म्हणाले. 1995 साली खूप साखर कारखाने बंद झाले. तेव्हा सत्तेत कोण होते? भूकंप झाला त्यावेळी आमच्याकडे दाखले नव्हते. मी आमदार झालो तेव्हा भूकंप दाखल्याचा प्रश्न मांडला. आता मुख्यमंत्री यांना सांगितले सरसकट भूकंप दाखले दया. आम्ही आग्रह धरला त्यामुळे कामे होत आहेत. आपल्या सरकारने भरपूर कामे केली आहेत. नाही तर मंत्री म्हणून कोट घालून नुसते फिरावे लागले असते, असा टोलाही त्यांनी उद्धव ठकारे यांचे नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी उठाव केला. आम्ही आमदारांनी पण उठाव केला. आम्ही शिंदे साहेबांना बोललो आपण काहीतरी निर्णय घ्या. भाजपसोबत चला असे आम्हीच त्यांना सांगितले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको. बाळासाहेब यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. दिल्लीवाले यांचा शब्द होता की मुख्यमंत्री शिंदे यांनाच करणार. गेल्या अडीच वर्षांतील कामे बघा. पावणे तीनशे योजना पाटण मतदारसंघात आहेत. याआधी काही होते का? अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ म्हणतात की मराठा आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यासाठी शरद पवारांनी विरोधी पक्षांना फोन केला होता. त्यामुळे सह्याद्रीवरील बैठकीला ते अनुपस्थितीत राहिले. मात्र, आम्ही सर्वांना बोलावले होते. पण, विरोधी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अनुपस्थित राहिले. छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत आधी काम केले आहे त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहित आहेत. आपल्या सरकारने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले आहे ते कोर्टातदेखील टिकेल. आमचे सरकार कटीबद्ध आहे. त्यामुळे आम्ही सह्याद्रीवर बैठक बोलावली होती. मात्र, विरोधी पक्षनेते गैरहजर राहिले असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधक बोलतात की सरकारने कर्ज काढले. हो! आम्ही कर्ज काढू. पण, ते कर्ज आम्ही सरकारच फेडणार आहोत. तुमच्याकडे सत्ता असताना त्यावेळी तुम्ही का नाही ही योजना काढली? विरोधक बोलत आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय काढले. पण, जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही का असे निर्णय का घेतले नाहीत असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

मोदी साहेबांनी शपथ घेऊन सांगितलं सविधान नाही बदलणार. मुख्यमंत्री शिंदे यांनीही संविधान बदलणार नाही हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना 2 महिने सुट्टी दया असे म्हणालो आहे. कारण, मला आता मतदारसंघात काम करायचे आहे. नाही तर नंतर बोलाल की मतदारसंघात लीड का मिळाला नाही. येथे विजयी झाल्यानंतर आपण पुन्हा मोठा हॉल घेऊन जंगी कार्यक्रम करू असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले

error: Content is protected !!