ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा गाडीचा रायगडात अपघात; अपघातात मेटेंचा म्रुत्यु; पोलिस करतात तपास! मेटे यांचा निधणाने राज्यात शोककला!

रायगड(धर्मानंद गायकवाड)- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा काल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापुर तालुक्यांतील माडप परीसरात अपघात झाला, या अपघातात मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे मेटे यांना मयत घोषित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला.
शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने राज्यात अनेक राजकीय नेते तसेच मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केलां, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे आज वाहन अपघाती झालेले निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काल मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. त्यामुळे बीड येथुन सिवसग्रांमचे नेते विनायक मेटे मुंबईकडे येत होते. मात्र या बैठकीपुर्वीच काळाने त्यांचावर घाला घातला, त्यांचा वाहनांचा रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुका हद्दीत एक्सप्रेस वे वर जबर अपघात झाला, मेटे यांचा चालकाचा वाहनांवरील ताबा सुटल्याने कोण्या अनोळखी वाहनावर मेटे यांचे वाहन धडकले, विनायक मेटे हे ज्या बाजुला बसले होते, त्याबाजुलाच धडक बसल्याने मेटे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता त्यांना येथिल वैद्यकीय तज्ञांनी म्रुत घोषित केले आहे.
दरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने मेटे बोलायचे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले मराठा आरक्षणातील मुख्य नेते विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आसल्याने मराठा समाजात प्रंचड सन्नाटा पसरला आहे. तसेच मेटे कुटुबींयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत माजी आमदार विनायक मेटे यांना अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे.
या घटनास्थळी रायगडचे पोलिस अधिक्षक अशोक दुधे हे दाखल झाले. सदर अपघात हा रसायनी पोलिस ठाणेचे हद्दीत झाल्याने या घचनेचा तपास रसायनी पोलिस करीत आहेत, रायगडचे पोलिस अधिक्षक यांनी रसायनी पोलिसांना तपासाबाबत सुचना दिल्या आहेत. तर अपघात स्थळी पोलिसांनी पंचनामा करुन मेटे यांची अपघातग्रस्त गाडी पोलिसांनी रसायनी पोलिस ठाणेत आणण्यात आली आहे. या घटनेबाबत रायगड पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटेनेने मात्र महाराष्ट्रभर शोककला पसरली आहे.

error: Content is protected !!