ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पुन्हा अंबानी कुटुंब टार्गेट- ठार मारण्याची धमकी


मुंबई/ भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी दहिसर मधून एका संशयिताला अटक केली आहे
संपूर्ण देश काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत होता याच दरम्यान सकाळी 8 चां सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील रुग्णालयात फोन आला आणि फोन करणाऱ्याने अंबानींच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर तत्काळ या प्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली प्रकरण हायप्रोफाइल असल्याने तत्काळ अंबानींच्या अंतलीया बंगल्या कडे पोलिसांचे विशेष पथक पाठवण्यात आले आणि सुरक्षा वाढवण्यात आली. तसेच सायबर सेलच्या टीमने कॉल डेटा रेकॉर्ड तपासून शोध घ्यायला सुरुवात केली आणि दहिसर मधून एका संशयिताला अटक केली सध्या त्याची चौकशी सुरू आहे
अंबानी यांच्या अंतलिया बंगल्याच्या बाहेर यापूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती तेंव्हापासून त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे

error: Content is protected !!