ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालिका अधिकाऱ्याला ४ हजाराची लाच घेताना अटक


मुंबई – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात . ते खरेच आहे. पालिका अधिकाऱ्यांना गलेलठ पगार मिळतो तरीही चिरीमिरी घेण्याचा हलकटपणा त्यांच्यातून काही जात नाही. पालिकेच्या टी विभागातील घनकचरा विभागाचे वित्तीय अधिकारी निर्वाना तेलगुटे याला एका कंत्राटदार महिलेकडून ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिका अधिकारी कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतात पण पण तेलगुटे याने ४ हजाराची लाच घेऊन जी चिंधीगिरी केलीय त्याने पालिकेतील सर्व लाचखोर अधिकाऱ्यांच्या मन शरमेने खाली झुकल्यात अशी प्रतिक्रिया पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
मुलुंडच्या कल्पतरू सोसायटीत राहणारे विनोद रोकडे हे संजीवनी नावाची सामाजिक संस्था चालवतात. सादर संस्थेला मुलुंड पश्चिमेकडील घंटीपाडा, उदय नगर गणेश पाडा येथील सफाईचे टेंडर मिळाले होते. महिला बचत गटाचे नेतृत्व करणाऱ्या त्यांच्या पत्नी रुपाली रोकडे यांनी १ जूनपासून या कामाची सुरुवात केली काही महिन्याने या संस्थेने कामाचे बिल पालिकेच्या संबंधित टी वार्ड अधिकाऱ्यांना दिले. बिल मिळाल्यावर संबंधित अधिकाऱ्याने त्यांना वर्क ऑर्डर दाखवायला सांगितली. तसेच वर्क ऑर्डर दाखवल्यावरच बिल अडा केले जाईल आणि पुढील काम हवे असल्यास ६ हजार द्यावे लागतील असे सांगितले. दरम्यान रुपाली रोकडे यांनी या घटनेची लाचलुचपत विभागाकडे तक्रर करताच सापळा रचून ४ हजाराची लाच घेताने तेलगुटे याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली

error: Content is protected !!