ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्या

धारावीतील जान मोहमद मुंबई हादरवणारा होता ? ए टी एस चे अपयश मुंबईच्या मुळावर

मुंबई/ दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून सह दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून जी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे ती सरकार आणि तपास यंत्रणांना हादरवून टाकणारी आहे.कारण आय एस आय च्या इशारा वरून हे सह दहशतवादी दिल्ली आणि मुंबई मध्ये ५ ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते मुंबईच्या धारावीत राहणारा जान मोहमद शेख या मिशनमध्ये महत्वाची भूमिका वाठवणार होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे जान मोहमद हा दाऊद चा साथीदार होता आणि सध्या दाऊद चा भाऊ इकबाल कस्करच्या संपर्कात होता याची महाराष्ट्र ए टी एस ला अजिबात कल्पना नव्हती म्हणून जान मोहमद पकडला गेला नाही .जर दिल्ली पोलिसांनी या सहा जणांना पकडले नसते तर त्यांनी दिल्ली मुंबई हादरवून टाकली असतो ए टी एस चे हे अपयश मुंबईकरांच्या मुळावर येणार होते पण सुदैवाने तसे झाले नाही.गणपती बाप्पानेच दिल्ली मुंबईला वाचवले असे आता लोक म्हणत आहेत .
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी माहिती मिळाली होती की गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवात दहशतवादी काहीतरी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे गुप्तचर संघटना दहशतवाद्यांच्या मागावर होती आणि त्यांना पक्की माहिती मिळताच त्यांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकास टी माहिती दिली त्यानंतर छापेमारी सुरू झाली आणि उत्तर प्रदेशातून पाच तर मुंबईवरून गोल्डन टेंपल मेलने दिल्लीला निघालेल्या जान मोदमद शेख या दहशत वाद्याला पोलिसांनी राजस्थानातील कोटा येथून अटक केली या जान मोहमद सोडता उर्वरित पाच दहशतवाद्यांकडून शस्त्र साठा ही मिळाला त्यानंतर त्यांना न्यायालयात उभे केले आता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान चौकशीत त्यांनी मुंबईत २तर दिल्लीत ३बॉम्ब स्फोट करण्याची योजना होती असे सांगितले इतकेच नव्हे तर दाऊद भाऊ इकबाल कासकर हा या काटा साठी आर्थिक रसद पुरवणार होता अशी माहिती दिली . दरम्यान काल महाराष्ट्र ए टी एस ने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्याला या कारस्थानची माहिती नसल्याचे काबूल केले त्याच बरोबर जान मोदमद हा गुन्हेगार असल्याचेही सांगितले मात्र त्याला कोटा येथून अटक करण्यात आली तो कर्जबाजारी होता . लोन कडून त्याने टॅक्सी घेतली होती पण तरीही त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली नसल्याने कदाचित तो या कटत सामील झाला असावा मात्र आमच्यात आणि दिली पोलिसात कुठलेही मतभेद नाहीत आम्ही दिल्लीला जाऊन आमच्याकडचे माहिती त्यांना देणार आहोत आणि त्यांच्याकडची माहिती आम्ही घेणार आहोत असे ए टी एस चे प्रमुख अगरवाल यांनी सांगितले .

बॉक्स/ दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू
दिल्ली पोलिसांनी ६दहशत वाद्यांना अटक करून एक मोठा दहशतवादी कट उधळला पण त्या वरून आता राजकारण सुरू झाले आहे दिल्ली पोलीस मुंबईतील दहशतवाद्याला पकडतात मग इथली ए टी एस काय झोपली होती काय? असा सवाल भाजपा नेते आशीष शेलार यांनी केला आहे ते पुढे म्हणाले सरकारने पोलिसांना सध्या नको त्यावकामात गुंतवून ठेवले आहे त्यामुळे दहशतवाद्यांवर पोलिसांचे लक्ष राहिले नाही अशी शेलारानी आरोप केलाय तर देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नात कुणी राजकारण आणु नये असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!