रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पालिकाच जातेय आर्थिक खड्ड्यात
: मुंबई – पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा मुंबई करांचा पैसा म्हणजे जणू काही आपल्या बाचीच पेंड आहे अशा पद्धतीने सत्ताधारी आणि पालिका प्रशासन त्या पैशाची उधळपट्टी करीत असतात त्यामुळे नागरी सुविधांच्या नावाखाली होणार्या या उधळपट्टीला आला बसने गरजेचे आहे मुंबई ही जगातील एक मोठी व्यापारी पेठ आणि देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथले इन्फ्रास्टक्यर कसे असला हवे हे वेगळे सांगायही गरज नाही पण मुंबईम मध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते आणि खड्डे पडून रस्त्यांची चाळन झाली की मग त्याच कंत्राटदारला ते खड्डे भरण्याचे काम कंत्राट दिले जाते . तेही वेगळे पैसे मोजून आताही मुंबईतील 24 विभागीय पालिका कार्यालयान मिळून 12 कोटी रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जे कंत्राटदार काळ्या यादीत आहेत . अशानाच पुन्हा रस्त्याची कामे दिली जात असल्याने मुबई महापालिकेवर चारी बाजूने टीकेची झोड सुरू आहे .मुंबईकरांच्या पैशाची ही लूटमार कधी थांबणार ज्या कंत्राटदारला रस्त्याची कामे दिली जातात ती कामे सुरू असताना रस्त्याच्या कामात कशा प्रकारचे मटेरियल वापरले जात आहे याची पालिकेडून दखलच घेतली जात नाही ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांची कंत्राटदारांशी अगोदरच सेटिंग असल्याने ते साईटवर फिरकताच नाही . वास्तविक रस्त्याची कामे केलीत त्या कंत्राटदाराटदारकडून त्याच पैशात रास्ते बुजवून घ्यायला हवेत पण तसे होत नाही रास्ते बांधण्यासाठीही पैसे द्यावे लागतात . त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात यांनी यालाच म्हणतात लूटमारीचा धंदा जो पालिकेत वर्षानु वर्ष सुरू आहे .पालिकेकडून मिळालेल्या माहिती नुसार 9 एप्रिल ते 11 सप्टेबर 2021 या काळात 33,156 खड्डे बुजवण्यात आले मुख्याता डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असल्याने मुंबईतील रस्त्यांचे कोंक्रेतीकरण केले जात आहे . मुंबईतील 2500 किमी रस्त्यांपाकी आतापर्यंत 750 किमी च्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे पण त्यानंतर तरी मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या संपेल अशी आशा बाळगला हरकत नाही . मात्र मुंबईतील रस्त्यांवरच्या या ख्ड्यामुळे मात्र आर्थिक दृष्ट्या चांगलीच खड्ड्यात जात असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरणी व्यक्त केली आहे .