महाराष्ट्रात पुन्हा एक भयंकर घटना घडणार होती पण … चोर समजून साधूंना चोपले
सांगली – पालघरमध्ये गैरसमजुतीमधून झालेल्या साधूंच्या हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता त्याचा तपास अजूनही संपलेला नाही .तोच पुन्हा एकदा तशीच भयंकर घटना सांगली जिल्ह्यातील जत मध्ये घडलेली आहे. . मुले चोरणारी टोळी समजून काही लोकांनी साधूंवर हल्ला केला वेळेवर आले म्हणून या साधूंचा जीव वाचला अन्यथा या ठिकाणी पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असती .
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या साधूंनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत साधूंना जमावाच्या तावडीतून सोडवले. साधूंकडील अधारकार्ड आणि त्यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते खरचं कोणतीही मुलं चोरणारी टोळी नसून, देवदर्शनासाठी पंढरपूरला जात असल्याचं समोर आलं आहे
कुठल्याही अनोळखी माणसांवर कसलाही संशय घेऊन त्यांना बेदम मारहाण करण्याचा या प्रकारांना मोब लींचींग म्हणतात आणि आजकाल असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत आणि त्यात निरपराध लोकांचा जीव जातोय पालघर मध्ये असाच प्रकार घडला आणि दोन साधू सह तिघांना जीव गमवावा लागला अजूनही ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे या प्रकरणी 100 पेक्षा अधिक लोकांना अटक झाली होती .त्यातील काहीना जामीन मिळाला तर काही अजूनही आत मधे सडत आहेत आणि पण त्या घटनेनंतर मोबलेंचींग विरुद्ध सरकारने कोणताही कठोर कायदा केला नाही . त्यामुळे पुन्हा पुन्हा तशाच घटना घडत आहेत नशीब बलवतर म्हणून ते बिचारे साधू वाचले पालघर हत्याकांडाची पूनरारुत्ती झाली आहे