ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

प्रकल्पांची पळवा पळवी

महाराष्ट्र हे भारतातील क्रमांक 1 चे औद्योगिक राज्य आहे पण महाराष्ट्राचे हेच वर्चस्व आणि वैभव काहींच्या डोळ्यात खुपते आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळविणाऱ्या लोकांचे दलाल महाराष्ट्राच्या सतेमधे बसलेले आहेत आणि तेच झरितले शुक्राचार्य बनून महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा अडवित आहेत . त्यामुळे अशा लोकांचे सतेचे मार्ग रोखणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे काम आहे जबाबदारी आहे महाराष्ट्रात येणारा वेदांत फोक्स कॉन हा प्रकल्प गुजरातने पळवला आणि त्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत केली केवळ केंद्रानेच मदत केली असे नाही तर मोदींचे काही दलाल जे महाराष्ट्राच्या सतेत मोक्याच्या जागी बसले आहेत त्यांनी या प्रकरणी मदत केली महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे . कारण 1.54 लाख कोटींच्या या प्रकल्पातून जवळपास 1 लाख रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार होते पण भाजपच्या लोकांनी महाराष्ट्राच्या पुढ्यात वाढलेलं हे ताट ओढून गुजरातला दिलं आहे . याची शिक्षा जर महाराष्ट्र या लोकांना देणार नसेल तर महाराष्ट्राने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये.कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दार लोकांना कधीच क्षमा केली नाही मग तो जावळीचा चंद्रराव मोरे असो की खंडोजी खोपडे असो महाराजांनी गद्दाराणा त्यांच्या पापाची शिक्षा दिली दुर्दैवाने शिवरायांच्या या महाराष्ट्रात आजही मोरे आणि खोपडे यांचे वारसदार जिवंत आहेत आणि त्यांचा जोवर बंदोबस्त केला जात नाही तोवर या महाराष्ट्राची प्रगती होणार नाही.महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आज फारशी चांगली नाही त्यातच कोविड काळात जवळपास दीड वर्ष उद्योगधंदे बंद होते परिणामी अपेक्षित महसूल गोळा होऊ शकला नाही त्यामुळे राज्यावरचे कर्ज वाढत गेले आणि अगोदरच कर्जबाजारी असलेला महाराष्ट्र आणखी कर्जबाजारी झाला

त्यामुळे आज महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक यायला हवी .त्यातून राज्याच्या तिजोरीत महसुली भर पाधायला हवी .राज्यात उद्योगधंदे आले तर इथली बेरोजगारी दूर होईल आमच्या शिकल्या स्वरलेल्या मुलांना रोजगार मिळेल महाराष्ट्रावर जे चार लाख कोटींचे कर्ज आहे ते फेडता येईल जर वेदांत फॉस्कोन प्रकल्प महाराष्ट्रात आला आता तर सेमी कंडक्टर निर्मितीच्या या प्रकल्पाशी संबंधित उत्पादनाचे जाळे निर्माण झाले असते त्यातून लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी मिळाली असती पण इथल्या महाराष्ट्र द्रोह्यानी हा प्रकल्प गुजरातला नेण्यास मदत केली आता भाजपच्या हिंदुत्वाच्या नाऱ्यानी महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे का ? त्यांच्या मुलाबाळांना रोजीरोटी मिळणार आहे का ? धर्म आणि कर्म याची गल्लत करणाऱ्या लोकांच्या जवळपास फिरकू नका कारण आता हा प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याने महाराष्ट्रातले लोक चिडलेत त्यांना शांत करण्यासाठी धर्माचा आधार घेतला जाईल ज्यांचा हा प्रकल्प गुजरातला नेण्यास विरोध आहे त्यांना हिंदुत्व विरोधी किंवा हिंदू धर्म विरोधी ठरवले जाईल . पण आमचा धर्म आमच्या ह्रुदयात,आमच्या घरातील देव्हाऱ्यात आमच्या मंदिरात सुरक्षित आहे तो यांच्या संगण्यामुळे असुरक्षित होणार नाही म्हणूनच या विषयात जर कोणी धर्म आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे जोड्याने थोबाड रंगवा आणि महाराष्ट्राचे खाऊन गुजरातची पालखी वाहणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा .

error: Content is protected !!