मढ स्टुडिओ कारवाईचा बागुलबुवा ? -सोमय्या- अस्लम शेख यांच्यात समझोता काय ?
४९ पैकी केवळ दोन स्टुडिओ वर कारवाई
मुंबई – काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या, खासदार गोपाळशेट्टी , अतुल भातखळकर , योगेश सागर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते बालाजी स्टुडिओ वर मीडियासह गेले होते .या स्टुडिओ कारवाई करावी अशी जोरदार मागणी होती पण कारवाई झाली नसल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे .
मालाड, मढ, नार्वे , एरगळ, भाटी या भागात 2021 व 22 या कालावधीत एनडीझेड , सीआरझेड यांचे उल्लंघन करत उभारण्यात आलेल्या अनाधिकृत स्टुडिओ पैकी मिलेनियर व एक्सप्रेशन या दोन स्टुडिओ वर मंगळवारी पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली . ‘ ४९ पैकी केवळ दोन स्टडीओ वर कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले असून या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्यामधील समझोता झाल्याची चर्चा आहे .पी -उत्तर विभागाच्या पथकाने कारवाई करण्याबाबत मंगळवारी सूत्रांनी माहिती दिलीः