ऋतुजा लटकेणा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली -अंधेरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई/ अंधेरी पूर्व मतदार संघातील विधानसभेची पोट निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेना साठी प्रतिष्ठेची बनलेली आहे .मात्र सेनेच्या मदतीला दोन्ही काँग्रेस असल्याने भाजपचा पराभव अटळ आहे असे बोलले जाते म्हणूनच काल अंधेरीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
काल सकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेतील राजीनाम्याचा अर्ज पालिकेने मंजूर केला त्यानंतर अशा मिरवणुकीने श्रीमती लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना नेते अनिल परब ,आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अजय चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सेनेच्या हजारो महिला कार्यकर्त्या हजर होत्या .यावेळी मूरजी पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे लोकहो आले होते . त्यावेळी तिथे शिंदे गटाचे लांडगेमामा दिसताच शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या त्यामुळे मामाना खाली मान घालून जावे लागले .दरम्यान या निवडणुकीत ऋतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून लढत असल्याने तिन्ही पक्षांची मते त्यांना मिळतील आणि त्या निवडून येतील अशी अंधेरीत चर्चा आहे .