ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन


पुणे/ शिवशाहीचा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविणारे जेष्ठ इतिहासकार आणि संशोधक बाबासाहेब पुरंदर यांचे आज पहाटे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल, पंतप्रधान मोदी यांच्यासह राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आजच दुपारी पुण्याच्या वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. मृत्यू समयी ते ९९ वर्षा होते.

मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आणि तिथेच त्यांनी सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या परवाठी येथील पुरंदर वाड्यात अंतीमदर्षणासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि दुपारी १२वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
२९ जुलै १९२२ रोजी जन्मलेले बळवंत मोरोपंत उर्फ, बाबासाहेब पुरंदरे हे पुढे मोठे इतिहास संशोधक म्हणून नावारूपाला आले त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या ललित लेख लिहला बाबासाहेबांचे जाणता राजा हे नाटक आजही अजरामर आहे. त्यांना भारत सरकारने पद्मिवी भूषण पुरस्काराने गौरव होते तर महाराष्ट्र सरकारनेही त्यांना महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवलं होते.

error: Content is protected !!