निलंबनाच्या कारवाईमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये भीती -न्यायालयाच्या नाराजिनंतरही संप सुरूच!
मुंबई/राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून गेल्या १५दिवसांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयांच्या नाराजीनंतरही सुरूच आहे.काल या संपाबबत न्यायालयाने अंतरिम आदेश देताना जे एस टी कामगार कामावर परतत आहेत त्यांना अडवू नका अशी सक्त ताकीद एस टी कामगारांना दिली आहे
काल मुंबई उच्च न्यायालयात एस टी कर्मचाऱ्यांना ऱयांच्या संपाबाबात न्या. राम कोटक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी आमचा संप सुरूच राहील असे कामगारांच्या कृती समितीने न्यायालयास सांगितले.त्यावर कामावर येणाऱ्या अडवू नका अशी सक्त ताकीद न्यायालयाने संप करी कामगारांना दिली तसे उद्या होणाऱ्या समितीच्या बैठकीला हजर राहून तुमचे म्हणणे मांडा तसेच या बैठकीचे इतिवृत्त सरकारने २२ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयात सादर करावे असा अंतरिम आदेश दिला आहे.त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान एस टी महामंडळाने आता पर्यंत२१७८ संपकरी कामगारांवर कारवाई केली आहे तर दुसरीकडे मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याची धमकी संपकरी देत आहेत पण अशा धमक्यानी काहीही साध्य होणार नाही असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे.