महाविकास आघाडीचे लोक हे तुष्टीकरणाचे गुलाम – विरोधकांवर मोदींची सडकून टीका
मुंबई – महा विकास आघाडीचे लोक हे तुष्टीकरणाचे गुलाम आहेत त्यांना मुंबईकरांशी काहीच घेणेदेणे नाही . अशा लोकांना जवळ करू नका . मुंबईचे भवितव्य महायुतीच घडवू शकेल अशा शब्दात पंतप्रधान मोडी यांनी आज मुंबईच्या सभेत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले
महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम आहेत. काँग्रेसने मुंबईचा कोणताही विकास केलेला नाही. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासात अडथळा. काँग्रेस हे सत्तेसाठी तडफडत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पीएम मोदी पुढे म्हणाले, मुंबईकरांचे स्वप्न महायुती पूर्ण करणार आहे. मुंबई सर्वाना जोडते, पण महाविकास आघाडी सर्वांना तोडते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे राहुल गांधी यांनी बोलून दाखवावे. काँग्रेस जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आली आहे, आणि यापुढेही करत राहिल. काँग्रेसच्या काळात मुंबईत दहशतवादी घटना घडत होत्या. भाजपच्या काळात दहशतवादाला आळा बसला, असेही त्यांनी सांगितले