ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

वाहतुकीचे नवे वाहन चालकांचा खिसा कापणारे-दंडाची रक्कम वाढवल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचा फायदा

मुंबई/ वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी परिवहन खात्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते पण ती मर्यादित स्वरूपाची आणि वाहन चालकांना परवडणारी असायला हवी.पण आत जो काही दंड आकारला जाणार आहे तो पूर्वी पेक्षा आठ ते दहा पट अधिक आहे.पूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारला जायचा आता पहिल्या वेळेस वाहतुकीचा नियम मोडल्यास५०० रुपये दंड,दुसऱ्या वेळेस नियम मोडल्यास १५०० रुपये दंड आकारला जाणार आहे तर परवाना नसताना गाडी चालवल्या स केवळ ५०० रुपये दंड होता गाडीची कागदपत्र नसल्यास ५हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.पूर्वी कारण नसताना हॉर्न वाजवल्यास २०० रुपये दंड होतात आता ५०० रुपये करण्यात आलाय तर दुसऱ्या वेळेस गुन्हा घडल्यास १५०० रुपये दंड आहे.वीणा हेल्मेट गाडी चालवल्या पहिल्या वेळेस ५०० तर दुसऱ्या वेळेस१५०० रुपये दंड आहे
दंडाची रक्कम वाढवल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचा फायदा आहे कारण दीड हजर रुपये दंड भरून पावती फडण्यापेक्षा ५०० रुपये ट्रॅफिक पोलिसांच्या हातावर ठेऊन मंडवल करून जाता येते थोडक्यात दंडाच्या या वाढीव रकमेमुळे वाहतूक खात्यातील भ्रष्टाचार वाढणार आहे.दंडाची रक्कम वाढवली म्हणून लोक वाहतुकीचे नियम पळतीलाच a असे नाही.मात्र हे नियम बनवणाऱ्या कळायला हवे अगोदरच रस्त्यावर खड्डे असतात त्यामुळे जास्त अपघात होतात अशावेळी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे जर अपघात झाला तर पालिकेला सुधा दंड आकारला जायला हवा

error: Content is protected !!