ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

नालेसफाई साठी पालिकेची हात घाई

मुंबई/ नालेसफाई मधील हातसफाई हा सत्ताधारी शिवसेना,पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या जिव्हाळ्याचा आणि कमाईचा विषय असल्याने यंदा नालेसफाईचा लगीन घाईसाठी पालिका उतवली झाली आहे.२०२२ चां निवडणुका कधीही जाहीर होऊन आचार संहिता लागेल आणि या आचारसंहितेत नालेसफाईच्या निविदा अडकु नयेत म्हणून पालिकेने हिवाळ्यातच म्हणजे डिसेंबर मध्येच नाले सफाईच्या २७ कोटींच्या निविदा काढल्यात मुंबईच्या पूर्व उपनग्रासाठी या निविदा आहेत आणि त्या दोन टप्प्यातील नाले सफाईसाठी आहेत पहिल्या टप्प्यात कुर्ला एल वार्ड,चेंबूर एम वार्ड, व मानखुर्द एस पश्चिम साठी १०.८३ कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी १.७२ कोटी तसेच एम घाटकोपर ,एस भांडुप आणि टी मुलुंड साठी पहिल्या टप्प्यात १३.८३ कोटी तर दुसरा टप्पा १.१८ कोटी अशा रकमेच्या या निविदा आहेत. २०२० मध्ये कोरोना काळात चार वेळा निविदा कडूनही कंत्राटदार न मिळाल्याने अस्थायी संस्थांकडून काम करून घेण्याचे ठरले होते पण त्यांनीही असमर्थता दाखवली जुन्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात आले मागील काही वर्षात फेब्रुवारी मार्च मध्ये निविदा मागवून एप्रिल मध्ये स्थायी समितीत प्रस्ताव आणण्यात आले मात्र उशिराने असलेल्या या प्रस्तावना स्थायी समितीत आडकाठी येत असल्याने यावेळी डिसेंबर मध्येच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.

error: Content is protected !!