ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!


वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्‍या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वयाचा एक महत्वाचा दुवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्राईम संध्याच्या दैनंदिनी डायरीचे प्रकाशन करण्याच्या उपक्रमाचे पोलीस उपायुक्तांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. गेल्या दहा वर्षांपासून क्राईम संध्याच्या या डायरीचा अभिनव उपक्रम सुरु असून या डायरीत पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे तिथल्या अधिकार्‍यांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईल नंबर या डायरीत असून कधीही कोणते संकट आले तर या डायरीतील नंबर पाहून संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी सहजपणे संपर्क साधता येऊ शकतो किंवा एखाद्या घडणार्‍या किंवा घडून गेलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना देण्याचे काम या डायरीच्या माध्यमातून होऊ शकते. पोलिसांशी थेट संपर्क साधण्यास मदत करण्याचे काम या डायरीच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस असो किंवा अन्य विविध क्षेत्रातील लोक असो सर्वांसाठी हि डायरी दिशादर्शकाचे काम करणारी आहे. केवळ पोलिसांचेच नाही तर जिल्ह्यातील रुग्णालये इतर सरकारी कार्यालये यांचेही नंबर या डायरीत असल्याने सर्वांसाठी हि डायरी उपयुक्त ठरू शकते. या कार्यक्रमाला क्राईम संध्याचे मुख्य संपादक लक्ष्मणराव पाटोळे, दैनिक वृत्त सिंहासनचे संपादक रूपेश वाढे, वसई संकल्पचे संपादक किरण सोलंकी, क्राईम संध्याचे कार्यालयीन उपसंपादक सोनू जाधव, राजरतन दर्शनचे संपादक राजाराम वाव्हळ, एनजीओ प्रमुख मिश्रा तसेच अन्य पत्रकार उपस्थित होते.

error: Content is protected !!