ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण

सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं.

सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. ते बुधवारी (१५ डिसेंबर) पत्रकार सुधाकर रेड्डी लिखित ‘ब्लड सँडर्स’ (Blood Sanders : The Great Forest Heist) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांची पहिली नोकरी ही पत्रकारितेची असल्याचं नमूद केलं आणि त्यांच्या तरूणपणातील वर्तमानपत्रात वेगवेगळे घोटाळे उघड करणाऱ्या रिपोर्टिंगविषयी आपली मत मांडली.

सरन्यायाधीश रमण म्हणाले, “ज्याची पहिली नोकरी पत्रकाराची होती असा व्यक्ती म्हणून मी आजच्या दिवशी माध्यमांवर काही विचार मांडण्याचं स्वातंत्र्य घेणार आहे. भूतकाळात शोध पत्रकारितेतून वेगवेगळे घोटाळे उघड व्हायचे, गैरव्यवहार समोर यायचे आणि त्यामुळे देशभरात पडसाद पडलेले आम्ही पाहिले आहेत. मात्र, सध्याच्या काळात एखाद दुसरा अपवाद सोडता अशा ताकदीची शोध पत्रकारिता पाहायला मिळत नाही. भारतात शोध पत्रकारिता नामशेष होत असल्याचं दिसत आहे.”

error: Content is protected !!