ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भोईवाड्यात मेगा शिबीर

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १४.१.२०२३ रोजी भोईवाड्यातील भावसार समाज मंदिर येथे आयुष्यमान भारत हेअल्थ अकाउंट कार्ड म्हणजेच आभा कार्डाचे मेगा शिबीर आयोजित केले होते.सुमारे ५०० हुन अधिक स्थानिक नागरिकांनी ह्या मेगा शिबिराचा लाभ घेतला.

स्थानिक लोकप्रिय आमदार वडाळा विधानसभा कालीदास कोळंबकर यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने हे शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पाडले.केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत हेअल्थ कार्ड या प्रकल्पआला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे व मेश्राम फौंडेशन हे मुंबईमध्ये विविध ठिकाणी हे उत्तम रीतीने नियमितपणे राबवित आहे.
आभा कार्ड मध्ये आरोग्य संबंधित लाभार्त्याची माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व ती आवश्यकते नुसार क्यू आर स्कॅन कोड द्वारे प्राप्त करता येते.

फौंडेशनचे संस्थापक श्री अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते,” समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विनामूल्य
सेवा सुविधा पोहचवणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय”

error: Content is protected !!