ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

कपडे फाडो अभियान


महाराष्ट्राच्या समोर जनतेच्या जीवन मरणाचा अनेक प्रश्न उभे आहे ज्यात अवकाळी पावसाने बरबाद झालेल्या कित्येक शेतकऱ्याना अजून आर्थिक मदत मिळालेली नाही ,पीक विम्याची हप्ते भरूनही विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळा टाळ करीत आहेत, एसटी कामगारांचा संप ,महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण नोकरभरती परीक्षेतील घोटाळे असे कितीतरी मुद्दे सरकार समोर असताना सध्या सत्ताधारी आणि विरोधक रोज पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांचे कपडे फाडीत आहेत. इतके असंवेदनशील लोक जगात कुठेही बघायला मिळणार नाहीत त्यांना लोकांची काहीच पडलेली नाही .सोमय्या आता अण्णा हजारे बनून शिवसेनेला लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढीत आहे. अरे पण तुमचे सरकार होते तेंव्हा शिवसेनाही तुमच्या सोबत होती तेंव्हा सोमय्या याच्या तोंडाला चिकटपट्टी लावली होती का? तेंव्हा तो का गप्प बसला हाच सोमय्या नारायण राणेंच्या विरोधात बोंबलत होता त्याच्या भ्रष्टाचारावर बोलत होता .आता राणे भाजपचे गेल्यावर साधू संत झाला का? आता सोमय्या याची वाचा का बसली? म्हणजे त्यांच्या बरोबर शिवसेना होती तेंव्हा भ्रष्टाचारी नव्हती आता त्यांची साथ सोडल्यावर भ्रष्टाचारी कशी झाली?आणि जर भ्रष्टाचारी होती तर तेंव्हा सोमय्या का गप्प बसले? राहता राहिला सवाल शिवसेनेचा तर काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जी ड्रामेबाजी केली ती हास्यास्पद होती.आता पत्रकार परिषदही गर्दी जमवून करण्याची पद्धत सुरू झाली तर प्रत्येक पक्ष असा ड्रामा करील आणि त्याचा पोलीस यंत्रणेवर ताण येईल उद्धव ठाकरे सांगत आहेत की अजूनही कोरोणा गेलेला नाही लोकांनी सोशल दिस्तेंस पाळायला हवे .मग काल तुमच्या लोकांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जी गर्दी केली होती. सोशल डीस्तेंसचा नियम पायदळी तुडवला त्यांच्यावर कारवाई कोण करणार? म्हणजे नियम फक्त सामान्य जनतेसाठी आहेत का ? याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी म्हणजे राजकीय पक्षांनी सभा,मेळावे,पत्रकार परिषदा,पोराबाळाची लग्न करू यासाठी गर्दी जमली तर चालेल पण सामान्य माणसाच्या मैतला चार खंदेकरी जमले तर सोशल डीस्तेंस्वनचा नियम मोडतो मिटला जमलेल्या लोकांमुळे कोरोणा पसरतो हा कुठला कायदा ? लोकशाहीत कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे पण तो फक्त कागदावर इतर वेळी राजकीय पक्षांच्या पुढारी लोकांसाठी वेगळे कायदे आणि जनतेसाठी वेगळे कायदे यालाच लोकशाही म्हणायचे का?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा सोमय्याच्या मुलाच्या कंपनीत गुंतवण्याी ची आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय पत्रवाल चाळीत मोहित कंबोज याचा पैसा गुंतलय असे संजय राऊत म्हणतात अरे पण तुमचे सरकार आहे चौकशी लावा तसेच न्यायालय आहे तिकडे दाद मागा ई डी सारख्या तपास यंत्रणा तुमच्यावर अन्याय करीत आहेत असे वाटत असेल तर तुमचे संसदेत खासदार आहेत त्यांना आवाज उठवायला सांगा इथे पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांचे कपडे कशापाय फाडताय? सोमय्या आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सूमोटो याचिका दाखल करून घ्यावी आणि या दोघांचीही चौकशी करून ते दोषी आढळले तर दोघानाही तुरुंगात डाबावे असे जनतेचे म्हणणे आहे कारण या लोकांनी जे घोटाळे केले आहेत ते जनतेच्या पैशातून झालेले आहेत त्यामुळे सरकार यांची चौकशी करणार नाहीत कारण सरकार आणि विरोधी पक्ष दोघेही एकमेकांना सामील आहेत सकाळी एकमेकांच्या आय माय चां उधार करणारे हे संध्याकाळी एकत्र बासून दारू पितात .आज शिवसेना भाजप वाद सुरू आहे पण उद्या ते एकत्र येनारच नाहीत असे कुणीही सांगू शकत नाही कारण राजकरणी कुठल्याही पक्षाचे असोत ते निर्लज्ज असतात आणि जेंव्हा वाटून खाण्याची वेळ येते तेंव्हा ते बरोबर एकत्र येतात. मात्र हे आपल्याला दिसत असून आम्ही त्यांच्या मागे विनाकारण भरकटत जातोय म्हणून त्यांचे फावले आहे. ज्या दिवशी जनता या लोकांच्या विरोधात दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धासाठी पेटून उठेल तेंव्हा सर्वच पक्षांच्य पुढारी लोकांना त्यांची औकात कळेल.

error: Content is protected !!