राऊत यांच्यावर सोमय्या व राणे यांचा हल्ला – सेना भाजपा मधे मोठा राडा होण्याची शक्यता
: मुंबई/ संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे आरोप केले होते त्यावर नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांनी जोरदार पलटवार केला त्यामुळं सेना भाजपतील ही लढाई आता हाथ घाईवर आली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्यावर आरोप करताना त्यांनी ठाकरेंचे अलीबागच्या कोलाई गावातील 19 बंगले दाखवावेत दाखवले तर मी राजकारण सोडीन ने दाखवले तर सोमय्या यांना जोड्याने मारा असे म्हटले होते त्यावर काल सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जर त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबाचे बंगले नव्हते तर मग त्या बंगल्याचा टॅक्स का ठाकरे कुटुंबांनी भरला संजय राऊत सुजित पाटणकर आणि पुण्यातील कोविड सेंटर मधल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत का बोलत नाही असा सवाल केला त्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर कठोर तिला केली संजय राऊत लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे असा आरोप राणेंनी केला तसेच या माणसाने लोकप्रिय मध्ये असताना बाळासाहेबांवर कशा प्रकारे टीका केली होती ते सांगितले. तसेच संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला एक विभाग प्रमुखंही नव्हता असे सांगितले .प्रवीण राऊत याच्यावर ई डी ची चौकशी लागल्याने संजय राऊत घाम फुटला असे राणेंनी सांगितले तसेच ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांच्या कंपनीत मुलाची भागीदारी कशी असा सवाल केला.