ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

80 वर्षाच्या वृध्द बापाला मुलाने दीड कोटीना फसवले


मुंबई: एक जमाना असा होता मुले आई बापाच्या सेवेत आपले जीवन अर्पित करायची. वृद्ध मातापित्याची कावड घेऊन काशीला जायचे आणि तीर्थ यात्रा घडवायचे पण आता मात्र मुले पैशासाठी आईबापाला ठार मारायला तयार होत आहेत, त्यांना घराबाहेर काढून बेघर करीत आहेत, त्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी हडप करीत आहेत. बोरिवली मध्ये अशाच एका घटनेत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा मध्ये तीन दुकानांचे मालक असलेल्या हस्तीमल जैन यांना त्यांच्याच मुलाने दीड कोटींचा गंडा घातला. हस्तीमल काही कामा निमित मुलाच्या भरोशावर दुकाने टाकून पर्युषण काळात गावी गेले होते. त्याचाच गैरफायदा घेऊन त्यांचा मुलगा प्रमोद मंडोत याने बापाचे दुकान गहाण ठेऊन त्यावर १ कोटी ५३ लाखांचे कर्ज घेतले होते .आणि त्यासाठी बोगस कागदपत्र तयार करून बापाच्या बनावट सह्या केल्या होत्या हस्तीमल जैन जेंव्हा मुंबईत परतले तेंव्हा त्यानं घरात बँकेच्या हप्ते थकवल्याच्या नोटीस मिळाल्या त्यांनी बँकेत चौकशी केले तेंव्हा सर्व फर्जीवाडा त्यांच्या लक्षात आला त्यानंतर त्यांनी सुरवातीला पोलिसांकडे नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद नोंदवण्याचा प्रयत्न केला पण प्रकरण कमी पैशाचे असल्याने तिथे गुन्हा दाखल करण्यात आला नाही .त्यानंतर शेवटी ते न्यायालयात गेले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार बोरिवली पोलीस ठाण्यात प्रमोदवर कलम ४२०,४६५,४६७,४६८आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे आपल्या ८० वर्षांच्या बापाला फसवणारा प्रमोद हा एकुलता एक मुलगा आहे.

error: Content is protected !!