ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा ?

मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे कर्मचारी बेमुदत संप करण्याचीही शक्यता आहे

विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आज विद्यापीठात, महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बैठकीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, १४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे.

मुंबईत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद आंदोलन’ पुकारल्याने मुंबईतील आज अनेक महाविद्यालय बंद, विद्यार्थ्यांच्या परीक्षांना या आंदोलनामुळे फटका बसला आहे. मागण्या लेखी स्वरुपात मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले.

बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने याचा फटका पदवी त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो

error: Content is protected !!