ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात कठोर असेल_ नितेश राणे यांची त्रिवेणी संगमात डुबकी


प्रयागराज/सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे आत्तापर्यंत 50 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही आपल्या मातोश्रींसह त्रिवेणी संगमात स्नान केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा आणि मौलिक क्षण आहे कारण कारण कुटुंबासह महा कुंभार त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम भाग्य मला प्राप्त झाले हिंदू संस्कृती परंपरा आणि आई प्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक म्हणून हा भावनिक क्षण माझ्या हृदयात कोरला जाईल गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमात स्नान करून सनातन धर्माच्या गौरवशाली परंपरेचा अनुभव यावेळी घेतल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले यावेळी त्यांना धर्मांतर विरोधी कायद्याबाबत विचारले असता महाराष्ट्र सरकारने धर्मांतर विरोधी कायदा समिती स्थापन केली आहे त्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले तसेच दरम्यान तर विरोधी कायदा महाराष्ट्रात सर्वाधिक कठोर असेल असेही नितेश राणे यांनी सांगितले

error: Content is protected !!